Rahul Dravid Viral Video: राहुल द्रविड एनसीए ग्राउंड स्टाफसोबत स्ट्रीट क्रिकेट खेळताना दिसले, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Rahul Dravid: सध्या राहुल द्रविड बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. दरम्यान, राहुल द्रविडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Rahul Dravid Viral Video: राहुल द्रविड एनसीए ग्राउंड स्टाफसोबत स्ट्रीट क्रिकेट खेळताना दिसले, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Photo Credit - X

Rahul Dravid Playing Gully Cricket With NCA Ground Staffs: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक, राहुल द्रविड यांनी अलीकडेच टीम इंडियाला टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद मिळवून देण्यात मोठे योगदान दिले होते. या विश्वचषकासोबत राहुल द्रविडचा (Raul Dravid) कार्यकाळही संपला. त्याचबरोबर माजी फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. सध्या राहुल द्रविड बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. दरम्यान, राहुल द्रविडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राहुल द्रविड नॅशनल क्रिकेट अकादमीच्या ग्राउंड स्टाफसोबत स्ट्रीट क्रिकेट खेळताना दिसत आहे. राहुल द्रविडने जीन्स आणि टी-शर्ट घातला आहे. यावेळी राहुल द्रविडने गोलंदाजीतही हात आजमावला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 11, 2024 09:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).