SRH vs PBKS, IPL 2024 Toss Update: पंजाबने हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय; पाहा प्लेइंग 11

पंजाब आणि हैदराबादने त्यांचे मागील सामने जिंकले असून दोन्ही संघ विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, पंजाबने हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

SRH vs PBKS, IPL 2024 Toss Update: पंजाबने हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय; पाहा प्लेइंग 11

SRH vs PBKS, IPL 2024: आज आयपीएल 2024 च्या 23व्या (IPL 2024) सामन्यात पंजाब किंग्जचा सामना सनरायझर्स हैदराबादशी (PBKS vs SRH) होत आहे. दोन्ही संघांमधला हा सामना चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पंजाब आणि हैदराबादने त्यांचे मागील सामने जिंकले असून दोन्ही संघ विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, पंजाबने हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरान, सिकंदर रझा, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (डब्ल्यू), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2024 07:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).