PBKS vs RR Live Streaming Online: 'करो किंवा मरो'च्या सामन्यात पंजाब आणि राजस्थान संघ आमनेसामने, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार सामना

हिमाचल क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Himachal Cricket Association Stadium) संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून हा सामना होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. सामन्यात पराभूत होताच या मोसमात दोघांचा प्रवास संपेल.

PBKS vs RR Live Streaming Online: 'करो किंवा मरो'च्या सामन्यात पंजाब आणि राजस्थान संघ आमनेसामने, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार सामना
PBKS vs RR

इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये शुक्रवारी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज (RR vs PBKS) यांच्यात सामना होणार आहे. हिमाचल क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Himachal Cricket Association Stadium) संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून हा सामना होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. सामन्यात पराभूत होताच या मोसमात दोघांचा प्रवास संपेल. राजस्थानने या मोसमात आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाने 6 जिंकले आहेत आणि 7 गमावले आहेत. संघाचे सध्या 12 गुण आहेत. सध्या संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. गेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर विविध भाषांमध्ये केले जाणार आहे. लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर उपलब्ध असेल. येथे इंग्रजी तसेच इतर भारतीय भाषांमध्ये समालोचन ऐकण्याचा पर्याय आहे. हा सामना Jio Cinema अॅपवर मोफत पाहता येईल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 19, 2023 12:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).