Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Scorecard: पंजाबचे आरसीबीला 157 धावांचे आव्हान; श्रेयस अय्यर अवघ्या 6 धावांवर बाद; प्रभसिमरन सिंगची सर्वाधिक 33 धावांची खेळी
टाटा आयपीएल 2025 चा 37 वा सामना आज पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड येथे खेळला जात आहे.
Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Scorecard: पंजाबकडून केणत्या फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कर्णधार श्रेयस अय्यर अवघ्या 6 धावांवर बाद झाला. तर, प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक 33 धावांची खेळी केली. टाटा आयपीएल 2025 चा 37 वा सामना आज म्हणजेच 20 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड येथे खेळला जात आहे. सशांग सिंगने 33 चेंडूत 31 धावा केल्या. प्रियांश आर्या ने 15 चेंडूत 22 धावा केल्या. आरसीबीकडून कृणाल पांड्याने 2 विकेट्य घेतल्या. नेहाल वडेराला बाद करताना मोठा रोमांच पहायला मिळाला. आरसीबीच्या खेळाडूंचा घाम काढला. त्याशिवाय, सुयश शर्माने दोन विकेट घेतल्या
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)