आज इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 18वा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे. मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या हंगामात दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी तीन सामने खेळले आहेत. त्यांना दोन सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पंजाब किंग्ज संघाला पहिला मोठा धक्का बसला. सलामीवीर प्रभसिमरन सिंग 0 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. पंजाब किंग्ज संघाचा स्कोअर 0/1.
Breakthrough in the very first over for @gujarat_titans and @MdShami11 finds early success in Mohali 😎#PBKS lose Prabhsimran Singh's wicket
Follow the match ▶️ https://t.co/qDQuP8ecgd #TATAIPL | #PBKSvGT pic.twitter.com/razP6N4FLn
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)