PSL 2022 Schedule: पाकिस्तान सुपर लीगचे वेळापत्रक जाहीर, सलामीच्या सामन्यात गतविजेते मुलतान सुलतान्सशी भिडणार कराची किंग्ज, पहा संपूर्ण शेड्युल

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आगामी पीएसएलच्या सातव्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. गतविजेता मुलतान सुलतान्स 27 जानेवारी रोजी पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2022 च्या सलामीच्या सामन्यात 2020 विजेत्या कराची किंग्जशी भिडतील. 32 दिवस चालणाऱ्या 34 सामन्यांच्या या स्पर्धेत सहा डबल-हेडरपैकी खेळले जाणार आहेत.

PSL 2022 Schedule: पाकिस्तान सुपर लीगचे वेळापत्रक जाहीर, सलामीच्या सामन्यात गतविजेते मुलतान सुलतान्सशी भिडणार कराची किंग्ज, पहा संपूर्ण शेड्युल
पाकिस्तान सुपर लीग ट्रॉफी (Photo Credit: Twitter/ICC)

पाकिस्तान सुपर लीगच्या (Pakistan Super League) सातव्या आवृत्तीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. पीएसएलची (PSL) सातवी आवृत्ती 27 जानेवारी 2022 पासून सुरू होणार आहे. टी-20 लीगचा पहिला सामना चॅम्पियन मुलतान सुलतान्स (Multan Sultans) आणि कराची किंग्ज (Karachi Kings) यांच्यात होणार आहे. मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जागा तयार करण्यासाठी लीग एक महिन्याने पुढे ढकलण्यात आली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 04, 2021 08:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).