Pratika Rawal Half Century: टीम इंडियाकडून प्रतिका रावलचे शानदार अर्धशतक; भारताला जिंकण्यासाठी अद्याप 75 धावांची आवश्यकता
प्रतिका रावलने सावध खेळ करत आपले अर्धशतक साजरे केले. सध्या भारताला या सामन्यात जिंकण्यासाठी 56 धावांची गरज असून प्रतिका रावलही 64 धावांवर खेळत आहे.
India Women National Cricket Team vs Ireland Women National Cricket Team, 1st ODI Match 2025 Live Score Update: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ, तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 10 जानेवारी (शुक्रवार) रोजी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट येथे खेळला जात आहे. आयर्लंड महिला क्रिकेट संघाने भारतीय महिला क्रिकेट संघासमोर पहिल्या एकदिवस य सामन्यात 239 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात आक्रमक झाली. कर्णधार स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांनी पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. यानंतर 29 चेंडूत 41 धावाकरून बाद झाला. यानंतर प्रतिका रावलने सावध खेळ करत आपले अर्धशतक साजरे केले. सध्या भारताला या सामन्यात जिंकण्यासाठी 56 धावांची गरज असून प्रतिका रावलही 64 धावांवर खेळत आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)