IND vs PAK Asia Cup 2023 Live Score Update: पाकिस्तानची दुसरी विकेट पडली 47 धावांवर, हार्दिकने बाबर आझमला केले क्लिन बोल्ड
पावासामुळे दुपारी 4.40 वाजता सामना सुरू झाला भारताने 24.1 षटकांपासून खेळण्यास सुरुवात झाली आणि भारताने पाकिस्तान समोर 357 धावांचे लक्ष्य ठेवले.
भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सुपर फोर सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. रविवारी खेळ पूर्ण होऊ शकला नाही म्हणु आज हा संपुर्ण सामना खेळवण्यात येत आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने पाकिस्तान समोर 357 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. पावसामुळे या सामन्यासाठी एसीसीने आधीच राखीव दिवस निश्चित केला होता. अशा स्थितीत हा सामना आज पूर्ण होणार आहे. पावासामुळे दुपारी 4.40 वाजता सामना सुरू झाला भारताने 24.1 षटकांपासून खेळण्यास सुरुवात झाली आणि भारताने पाकिस्तान समोर 357 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडू विराट कोहली आणि केएल राहुने शतक ठोकले आहे तर कर्णधार रोहित शर्मा आणि शुमभन गिलने अर्धशतक झळकावले आहे. लक्ष्याचा पाठलाग करत पाकिस्तानने आपली दुसरी विकेट गमावली आहे. त्याने बाबर आझमला बाद केले. पाकिस्तानचा स्कोर 43/2