ICC Women’s T20 World Cup 2024 Pakistan vs Sri Lanka Playing XI: पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रोमांचक सामना; दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हन खेळाडूंवर नजर टाका
आयसीसी महिला टी 20 विश्वचषक आजपासून सुरू झाला आहे. टी 20 विश्वचषकाचा दुसरा सामना पाकिस्तान महिला संघा विरोधात श्रीलंका महिला संघात होत आहे. उभय संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघांमध्ये आज रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
Pakistan Women National Cricket Team vs Sri Lanka Women National Cricket Team, ICC Womens T20 World Cup 2024 2nd Match: आयसीसी महिला टी 20 विश्वचषक आजपासून सुरू झाला आहे. टी 20 विश्वचषकाचा दुसरा सामना पाकिस्तान महिला संघा विरोधात श्रीलंका महिला संघात होत आहे. उभय संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. पाकिस्तानची कमान फातिमा सनाच्या हातात आहे. तर श्रीलंकेचे नेतृत्व चमारी अथापथुकडे आहे. दोन्ही संघांमध्ये आज रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. आता पाकिस्तान महिला क्रिकेट संघ आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघ यांच्यात एकूण 20 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत पाकिस्तान संघाने 10 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर श्रीलंकेच्या संघाने नऊ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. दरम्यान, पाकिस्तानची कर्णधार सना फातिमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या रोमांचक सामन्यात दोन्ही संघ या दिग्गज खेळाडूंसोबत मैदानात उतरले आहेत. (हेही वाचा: BAN vs SCO ICC Women T20 World Cup 2024: वुमन्स टी20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशची विजयी सलामी; बांगलादेशचा स्कॉटलंडवर 16 धावांनी विजय)
दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
🚨 TOSS & PLAYING XI 🚨
Pakistan win the toss and elect to bat first 🏏
Our playing XI for today 👇#PAKWvSLW | #T20WorldCup | #BackOurGirls pic.twitter.com/VM8MumTrao
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 3, 2024
पाकिस्तान संघ: मुनिबा अली (विकेटकीपर), गुल फिरोजा, सिद्रा अमीन, निदा दार, आलिया रियाझ, फातिमा सना (कर्णधार), तुबा हसन, नशरा संधू, डायना बेग, सादिया इक्बाल, ओमिमा सोहेल.
🇵🇰 T20 World Cup 2024: Match 2 - Pakistan vs Sri Lanka 🇱🇰
TOSS: PAK, BAT#T20WorldCup pic.twitter.com/WYSObotXMr
— Women’s CricZone (@WomensCricZone) October 3, 2024
श्रीलंका संघ: विशामी गुणरत्ने, चामरी अथापथु (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), नीलाक्षी डी सिल्वा, हसिनी परेरा, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शिनी, सचिन निसानसाला, उदेशिका प्रबोधिनी.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2024 08:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

