Naseem Shah Injury: पाकिस्तान संघाला बसू शकतो मोठा धक्का, अनुभवी वेगवान गोलंदाज नसीम शाह विश्वचषकातून होऊ शकतो बाहेर
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह संपूर्ण विश्वचषकातून बाहेर होण्याची शक्यता आहे. स्कॅनमध्ये त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाल्याचे समोर आले असून ते अधिक गंभीर मानले जात आहे.
आशिया चषक स्पर्धेनंतर ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी संघांची तयारी सुरू होईल. भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने सुरुवात होणार आहे. यानंतर 6 ऑक्टोबरला पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात सामना होणार आहे. पाकिस्तान संघाला आशिया चषकातील पराभव विसरून पुढे जायला आवडेल, पण मोठ्या स्पर्धेपूर्वी त्याचे टेन्शन वाढले आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह संपूर्ण विश्वचषकातून बाहेर होण्याची शक्यता आहे. स्कॅनमध्ये त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाल्याचे समोर आले असून ते अधिक गंभीर मानले जात आहे. असे म्हटले जात आहे की पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) नसीमसाठी दुस-या मताची मागणी करत आहे, परंतु दुबईत झालेल्या चाचणीत असे दिसून आले आहे की दुखापतीमुळे तो वर्षभर बाहेर असू शकतो.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)