Babar Azam And Shaheen Afridi: आशिया चषकातून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये एकमेकांशी भिडले, मोहम्मद रिझवानला करावा लागला हस्तक्षेप

पाकिस्तानचे आशिया कप फायनल खेळण्याचे स्वप्न भंगले. आता ड्रेसिंग रुममधून बातमी आली आहे की पाकिस्तान संघाचे खेळाडू एकमेकांशी भिडले आहेत. खरं तर, टीमचा कर्णधार बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात ड्रेसिंग रूममध्ये काहीतरी झाले आहे, जे शांत करण्यासाठी मोहम्मद रिजवानला हस्तक्षेप करावा लागला.

गेल्या गुरुवारी आशिया चषकात (Asia Cup 2023) श्रीलंकेने सुपर-4 सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले. या दणदणीत पराभवाने पाकिस्तानचे आशिया कप फायनल खेळण्याचे स्वप्न भंगले. आता ड्रेसिंग रुममधून बातमी आली आहे की पाकिस्तान संघाचे खेळाडू एकमेकांशी भिडले आहेत. खरं तर, टीमचा कर्णधार बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात ड्रेसिंग रूममध्ये काहीतरी झाले आहे, जे शांत करण्यासाठी मोहम्मद रिजवानला हस्तक्षेप करावा लागला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये बोलावले. ड्रेसिंग रुममध्ये कर्णधार बाबर आझम खेळाडूंशी त्यांच्या खराब कामगिरीबद्दल बोलत होता, मात्र संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने बाबर आझमला अडवत किमान ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली त्यांचे कौतुक करायला हवे. यानंतर बाबर आझमला शाहीन शाह आफ्रिदीचे म्हणणे आवडले नाही. बाबर आझम म्हणाले की, मला माहित आहे की कोणी चांगली कामगिरी केली आहे. बाबर आझम आणि शाहीन शाह आफ्रिदी यांच्यातील संभाषण इतके वाढले की संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानला हस्तक्षेप करावा लागला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement