PAK vs AUS 2022: 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा निश्चित, द्विपक्षीय मालिकेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (CA) शुक्रवारी ऑस्ट्रेलियन संघाच्या तीन कसोटी आणि वनडे व एक टी-20 सामन्याच्या पाकिस्तान दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. लॉजिस्टिक आणि ऑपरेशनल आव्हाने कमी करण्यासाठी तसेच पाकिस्तान डे रिहर्सल, जे सामान्यतः मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात इस्लामाबादमध्ये सुरू होते, टाळण्यासाठी वेळापत्रक सुधारित केले गेले आहे.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

PAK vs AUS 2022: 24 वर्षांनंतर अखेर द्विपक्षीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्याला (Australia Tour of Pakistan) मान्यता मिळाली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने अखेरीस 1998 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता.  शुक्रवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (Australia) संचालकांच्या बैठकीनंतर पाकिस्तानमध्ये (Pakistan) तीन कसोटी आणि वनडे व एका टी-20 सामन्यांच्या सुधारित वेळापत्रकाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. पहिली कसोटी 4 ते 8 मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे तर 29 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान चार व्हाईट-बॉल सामने खेळले जातील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now