On This Day in 1993: आजच्या दिवशी 28 वर्षांपूर्वी Shane Warne याच्या ‘बॉल ऑफ द सेन्च्युरी’ ने उडवला Mike Gatting यांचा त्रिफळा (Watch Video)

1993 अ‍ॅशेस मालिकेत त्याने इंग्लंडचे फलंदाज माईक गॅटिंग यांना टाकलेल्या या चेंडूची क्रिकेटविश्वात चांगलीच चर्चा रंगली होती.

शॅन वॉर्नचा बॉल ऑफ द सेंच्युरी (Photo Credit: Twitter/@ICC)

On This Day in 1993: आजच्याच दिवशी 28 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाचे (Australia) माजी महान लेगस्पिनर शेन वॉर्नने (Shane Warne) जगप्रसिद्ध ‘बॉल ऑफ द सेन्च्युरी’ (Ball Of The Century) टाकला होता. 1993 अ‍ॅशेस (Ashes) मालिकेत त्याने इंग्लंडचे फलंदाज माईक गॅटिंग (Mike Gatting) यांना टाकलेल्या या चेंडूची क्रिकेटविश्वात चांगलीच चर्चा रंगली होती. आपल्या पहिल्याच चेंडूला त्याने उंची दिली आणि चेंडू टप्पा घेऊन लेग स्टंपच्या बाहेर पडला. हे पाहून गॅटिंगने आपला पाय लेग स्टंपच्या बाहेर काढून खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र आश्चर्यकारक रित्या चेंडू ऑफ स्टंपला गेला आणि गॅटिंगचा त्रिफळा उडाला. या चेंडूला नंतर अनेकांनी ‘बॉल ऑफ द सेन्च्युरी’चा किताब दिला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)