KL Rahul Six Shadab Khan: अरे बाप रे! शादाब खानच्या चेंडूवर केएल राहुलने लगावला गगनचुंबी षटकार, कोहली-रोहित झाले थक्क (Watch Video)
भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सुपर फोर सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. रविवारी खेळ पूर्ण होऊ शकला नाही म्हणु आज हा संपुर्ण सामना खेळवण्यात येत आहे. रविवारी 24.1 षटकांनंतर पावसामुळे भारतीय डावात व्यत्यय आला.
भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सुपर फोर सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. रविवारी खेळ पूर्ण होऊ शकला नाही म्हणु आज हा संपुर्ण सामना खेळवण्यात येत आहे. रविवारी 24.1 षटकांनंतर पावसामुळे भारतीय डावात व्यत्यय आला. यानंतर एकही चेंडू टाकता आला नाही. या सामन्यासाठी एसीसीने आधीच राखीव दिवस निश्चित केला होता. अशा स्थितीत हा सामना आज पूर्ण होणार आहे. दुपारी 4.40 वाजता सामना सुरू झाला. भारताने 24.1 षटकांपासून खेळण्यास सुरुवात केली. हा सामना 50-50 षटकांचा खेळवला जाईल. दरम्यान, केएल राहुने झटपट अर्धशतक ठोकल्यानंतर त्याने शादाब खानच्या चेंडूवर असा गगनचुंबी षटकार ठोकला की कोहली आणि रोहितही थक्क झाले.
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)