आता या मोठ्या स्पर्धेत खेळताना दिसणार Surya Kumar Yadav, मुंबईचा संघ होणार आणखी मजबूत
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपूर्वी सूर्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगलीच रंगत जमा केली आहे.
Ranji Trophy 2022: सूर्या आता प्रदीर्घ विश्रांतीनंतर रणजी ट्रॉफी 2022-23 हंगामात अॅक्शन करताना दिसणार आहे. 20 डिसेंबर रोजी मुंबई आणि हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात सूर्यकुमार यादवचाही (Surya Kumar Yadav) समावेश करण्यात आला आहे. सूर्याच्या आगमनाने मुंबईचा संघ आणखी मजबूत झाला आहे. दुसरीकडे, मुंबईने (Mumbai) पहिल्या सामन्यात आंद्राच्या संघाचा 9 गडी राखून पराभव केला. सूर्याने शेवटचा रणजी सामना तीन वर्षांपूर्वी खेळला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपूर्वी सूर्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगलीच रंगत जमा केली आहे. जर आपण प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सूर्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्याने 77 सामन्यांमध्ये 44.01 च्या सरासरीने 5326 धावा केल्या आहेत. रणजीमध्ये पुन्हा एकदा चांगली कामगिरी करून सूर्या भारतीय कसोटी संघाचे दरवाजे ठोठावू शकतो.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)