IND vs NZ 3rd ODI Live Score: न्यूझीलंडची दुसरी विकेट पडली 106 धावांवर, कुलदीपने निकोल्सला केले बाद
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 9 गडी गमावून 385 धावा केल्या. टीम इंडियासाठी सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक 112 धावांची खेळी खेळली.
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाने या मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत भारतीय संघ ही मालिका 3-0 ने जिंकण्याचा प्रयत्न करेल. न्यूझीलंड संघाचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 9 गडी गमावून 385 धावा केल्या. टीम इंडियासाठी सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक 112 धावांची खेळी खेळली. न्यूझीलंडकडून जेकब डफी आणि ब्लेअर टिकनर यांनी सर्वाधिक 3-3 बळी घेतले. न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 386 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाला दुसरा मोठा झटका बसला. कुलदीपने निकोल्सला केले बाद. न्यूझीलंडचा स्कोर 111/2.
3RD ODI. WICKET! 14.5: Henry Nicholls 42(40) lbw Kuldeep Yadav, New Zealand 106/2 https://t.co/ojTz5RqWZf #INDvNZ @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 24, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 24, 2023 06:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

