Nepal: पोलिसांकडून नेपाळचा कर्णधार संदीप लामिछाने याला अटक, अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप
संदीप लामिछाने याला गुरुवारी 6 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याने आपल्या चाहत्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की तो पूर्णपणे निर्दोष आहे.
नेपाळ संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएल खेळाडू संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याला काठमांडू विमानतळावर अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला नेपाळ पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, त्याने यापूर्वीच आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून आत्मसमर्पण केल्याचे सांगितले होते. संदीप लामिछाने याला गुरुवारी 6 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याने आपल्या चाहत्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की तो पूर्णपणे निर्दोष आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएल खेळणाऱ्या संदीप लामिछानेने नुकतेच फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, तो निर्दोष आहे आणि कोणत्याही प्रकारच्या तपासासाठी पोलिसांना सहकार्य करेल. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासादरम्यान आपले वकील सोबत ठेवण्याची परवानगीही त्यांनी मागितली होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement