'लोकांना मदत करण्याची माझी वेळ'! Mission Oxygen साठी ‘गब्बर’ Shikhar Dhawan कडून 20 लाखांसह IPL मधील बक्षीस रक्कम दान देण्याची घोषणा

दिल्ली कॅपिटल्सचा सलामी फलंदाज शिखर धवनने कोविडग्रस्त भारतात ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी 'Mission Oyxgen' साठी 20 लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. शिवाय, आयपीएल 2021 मध्ये जिंकलेली सर्व बक्षीस रक्कम मदतकार्यासाठी देणगी म्हणून देणार असल्याची घोषणाही धवनने केली.

शिखर धवन (Photo Credit: PTI)

दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सलामी फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) कोविडग्रस्त भारतात ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी 'Mission Oyxgen' साठी 20 लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. शिवाय, आयपीएल (IPL) 2021 मध्ये जिंकलेली सर्व बक्षीस रक्कम मदतकार्यासाठी देणगी म्हणून देणार असल्याची घोषणाही धवनने केली. कोरोना व्हायरस  (Coronavirus Pandemic) महामारीच्या दुसर्‍या लाटात भारतात दररोज लाखो नवीन प्रकरणांची नोंद केली जात असून देशात कोरोनाने मृतांची संख्या 2,00,000 पार पोहचली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement