MI vs PBKS: मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

दोन्ही संघांमधील हा सामना मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे.

MI vs PBKS

आयपीएलच्या 46व्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर पंजाब किंग्जचे (MI vs PBKS) आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईसाठी रोहितचा आयपीएलमधला हा 200 वा सामना आहे.

प्लेइंग इलेव्हनवर टाका एक नजर 

पंजाब किंग्ज : प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम कुरन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now