MI vs LSG IPL 2023 Eliminator Toss Update: मुंबई इंडियन्सने लखनौविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

आज लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (LSG vs MI) यांच्यात होणार आहे. हा सामना चेन्नई (Chennai) येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल.

MI vs LSG IPL 2023 Eliminator Toss Update: मुंबई इंडियन्सने लखनौविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
LSG vs MI (Photo Credit - Twitter)

इंडियन प्रीमियर लीग 2023 चा (IPL 2023) एलिमिनेटर सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (LSG vs MI) यांच्यात होणार आहे. हा सामना चेन्नई (Chennai) येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. हा सामना दोन्ही संघांच्या अंतिम सामन्यासारखा आहे. दोन्ही संघांमध्ये आज रोमांचक सामना रंगणार आहे. हा सामना जिंकणारा संघ गुजरात टायटन्ससोबत (Gujarat Titans) दुसरा क्वालिफायर खेळेल. दरम्यान, मुंबईने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

लखनौ सुपर जायंट्स : आयुष बडोनी, दीपक हुडा, प्रेरक मंकड, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), क्रुणाल पंड्या (कर्णधार), कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर, मोहसिन खान.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 24, 2023 07:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).