MI vs RR, IPL 2023 Live Score Update: मुंबई इंडियन्सचा डाव फसला, संदीप शर्माने सूर्यकुमार यादवला बनवला आपला बळी
दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 42 वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 212 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सच्या वतीने सलामीवीर यशस्वी जैस्वालने वेगवान फलंदाजी करताना 124 धावांची खेळी केली. मुंबई इंडियन्सकडून अर्शद खानने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला 20 षटकात 213 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाला चौथा मोठा धक्का बसला आहे. सूर्यकुमार यादव 55 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. मुंबई इंडियन्स संघाचा स्कोअर 152/4.
Match 42. WICKET! 15.4: Suryakumar Yadav 55(29) ct Sandeep Sharma b Trent Boult, Mumbai Indians 152/4 https://t.co/trgeZNGiRY #TATAIPL #MIvRR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2023 11:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

