WPL 2023 साठी मुंबई इंडियन्सचे 'आली रे' गाणं रिलीज, शनिवारी होणार MI vs GT पहिला सामना (पहा व्हिडिओ)
'आली रे' थीम सॉंगमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौर आणि गोलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक झुलन गोस्वामी यांची झलक दाखवण्यात आली आहे.
टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीग 2023 साठी त्यांचे गाणे रिलीज केले. 'आली रे' थीम सॉंगमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौर आणि गोलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक झुलन गोस्वामी यांची झलक दाखवण्यात आली आहे. तरुण मुली मुंबई इंडियन्सचे झेंडे घेऊन संघाला पाठिंबा म्हणून उत्साहाने धावताना दिसतात. मुंबई इंडियन्स त्यांच्या WPL 2023 मोहिमेची सुरुवात 4 मार्च रोजी गुजरात जायंट्सविरुद्ध करणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)