T20 World Cup 2022: दुखापतग्रस्त बुमराहच्या जागी मोहम्मद शमी संघात, सिराज आणि शार्दुल राखीव स्थानात

मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना राखीव खेळाडूंच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.

मोहम्मद शमी स्कॉटलंड हॅटट्रिक (Photo Credit: Twitter/T20WorldCup)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) जखमी जसप्रीत बुमराहच्या जागी संघाची घोषणा केली आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) टी-20 विश्वचषकात बुमराहची जागा घेणार आहे. यासह मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना राखीव खेळाडूंच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. T20 विश्वचषकासाठी बीसीसीआयने आपल्या अंतिम 15 खेळाडूंची यादी आयसीसीकडे (ICC) पाठवली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)