विश्वचषकापूर्वी Mohammed Shami कोर्टात हजर, पत्नीच्या छळ प्रकरणात मिळाला जामीन
न्यायालयाने त्यांचा अर्ज स्वीकारला. विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेटपटू मंगळवारी कोर्टात हजर झाला. शमीचा भाऊ मोहम्मद हसिमही त्याच्यासोबत होता.
भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला (Mohammed Shami) पत्नीच्या छळ प्रकरणी मंगळवारी जामीन मिळाला आहे. अलीपूर न्यायालयाने मोहम्मद शमीला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते. भारतीय क्रिकेटपटूने मंगळवारी न्यायालयात हजर राहून जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने त्यांचा अर्ज स्वीकारला. विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेटपटू मंगळवारी कोर्टात हजर झाला. शमीचा भाऊ मोहम्मद हसिमही त्याच्यासोबत होता. दोघांनी जामिनासाठी अर्ज केला. न्यायाधीशांनी याचिका मान्य करत दोघांनाही जामीन मंजूर केला. शमीचे वकील सलीम रहमान म्हणाले, 'शमी आणि त्याचा भाऊ हसिम कोर्टात हजर झाले. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. सलीम यांच्याशिवाय वकील नजमुल आलम सरकार न्यायालयात उपस्थित होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)