ICC ODI Ranking 2023: आयसीसी क्रमवारीत मोहम्मद सिराजची मोठी झेप, बनला जगातील नंबर 1 वनडे गोलंदाज

त्याने अव्वल स्थानावर असलेल्या जोश हेझलवूडला मागे टाकले आहे.

Mohammed Siraj (Photo Credit - Twitter)

Mohammed Siraj Becomes Number 1 ODI Bowler: वनडे वर्ल्ड कप 2023 च्या आधी टीम इंडियाला एक मोठी खुशखबर मिळाली आहे. खरं तर, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा जगातील नंबर 1 वनडे गोलंदाज बनला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत सिराजने 8 स्थानी झेप घेतली आहे. त्याने अव्वल स्थानावर असलेल्या जोश हेझलवूडला मागे टाकले आहे. मोहम्मद सिराजने कोलंबोमध्ये श्रीलंकेला 50 धावांवर बाद केल्याने त्याला आयसीसी पुरुषांच्या वनडे गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान मिळण्यास मदत झाली आहे. त्याच्या 6/21 च्या आशिया चषक विजेत्या स्पेलने त्याची चर्चा झाली. सिराजने यापूर्वी मार्च 2023 मध्येही हे स्थान मिळवले होते. पण नंतर त्याला जोश हेझलवूडने मागे टाकले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)