IND vs SL, Asia Cup 2023 Final Live Update: मोहम्मद सिराजचा आशिया कपच्या फायनलमध्ये कहर, श्रीलंकेला दिला सातवा धक्का
श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेला सातवा धक्का लागला आहे. श्रीलंकेचा स्कोर 33/7
टीम इंडिया आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील आशिया कपचा अंतिम सामना (Asia Cup Final 2023) आज कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर (Colombo R Premadasa Stadium) खेळला जात आहे. दोन्ही संघांचे लक्ष जेतेपदाकडे लागले आहे. टीम इंडिया आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेत प्रत्येकी एकच सामना गमावला आहे. आशिया कपमध्ये टीम इंडिया आणि श्रीलंका अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी दोन्ही संघ अंतिम फेरीत 7 वेळा आमनेसामने आले आहेत. दरम्यान, श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेला सातवा धक्का लागला आहे. श्रीलंकेचा स्कोर 33/7
ASIA CUP FINAL 2023. WICKET! 11.2: Kusal Mendis 17(34) b Mohammed Siraj , Sri Lanka 33/7 https://t.co/xrKl5d85dN… #INDvSL
— BCCI (@BCCI) September 17, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 17, 2023 04:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

