MI vs CSK IPL 2021 Match 27: Kieron Pollard ने यंदाच्या हंगामातील ठोकले वेगवान अर्धशतक, पृथ्वी शॉला टाकले पिछाडीवर

पोलार्डने चेन्नई गोलंदाजांचा क्लास घेतली व अवघ्या 17 चेंडूत वेगवान अर्धशतक ठोकले. पोलार्डने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 6 उत्तुंग सिक्स लगावले.

कीरोन पोलार्ड (Photo Credit: PTI)

MI vs CSK IPL 2021 Match 27: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) तडाखेबाज अष्टपैलू किरोन पोलार्डने (Kieron Pollard) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध सामन्यात कमालीची कामगिरी केली आणि यंदाच्या आयपीएलमधील (IPL) सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले आहे. पोलार्डने चेन्नई गोलंदाजांचा क्लास घेतली व अवघ्या 17 चेंडूत वेगवान अर्धशतक ठोकले. पोलार्डने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 6 उत्तुंग सिक्स लगावले. पोलार्डच्या या वादळी खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सचा पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. पृथ्वीने 18 चेंडूत यंदा ही कामगिरी बजावली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)