Mastercard BCCI New Title Sponsor: पेटीएम ऐवजी आता मास्टरकार्ड भारताच्या सामन्यांचे असणार प्रायोजक

मोबाइल पेमेंट आणि फायनान्स कंपनी पेटीएमने 2019 मध्ये BCCI सोबत 4 वर्षांसाठी प्रायोजकत्व करार केला होता.

Photo Credit - Twitter

भारतात जे काही क्रिकेट सामने होतील त्यात पेटीएम (Paytm) ऐवजी मास्टरकार्ड (Mastercard) नवीन प्रायोजक असेल. मोबाइल पेमेंट आणि फायनान्स कंपनी पेटीएमने 2019 मध्ये BCCI सोबत 4 वर्षांसाठी प्रायोजकत्व करार केला होता. पण तो करार वेळेआधीच मोडला, त्यानंतर बीसीसीआयने हे अधिकार जागतिक पेमेंट्स आणि आयटी कंपनी मास्टरकार्डकडे हस्तांतरित केले. या करारानुसार, 2023 पर्यंत देशात होणारे सर्व आंतरराष्ट्रीय (महिला आणि पुरुष) क्रिकेट सामने तसेच ज्युनियर क्रिकेट (19 वर्षांखालील आणि 23 वर्षांखालील) सामन्यांव्यतिरिक्त इराणी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि देशांतर्गत क्रिकेट सामने होणार आहेत. बीसीसीआयने आयोजित केलेल्या रणजी ट्रॉफीसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला मास्टरकार्ड प्रायोजित करेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now