IPL 2023 Match 10, LSG vs SRH Live Score Update: लखनौ सुपर जायंट्सचा घरच्या मैदानावर सलग दुसरा विजय, सनरायझर्स हैदराबादचा पाच गडी राखून केला पराभव
तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 121 धावा केल्या.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या मोसमात आज लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगला. लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा पाच गडी राखून पराभव केला. तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 121 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. लखनौ सुपर जायंट्सकडून कृणाल पांड्याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्स संघाने 16 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य (127 धावा) पूर्ण केले. लखनौ सुपर जायंट्ससाठी सलामीवीर आणि कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. सनरायझर्स हैदराबादकडून आदिल रशीदने सर्वाधिक दोन बळी घेतले.
Match 10. Lucknow Super Giants Won by 5 Wicket(s) https://t.co/3AtXI7lgak #TATAIPL #LSGvSRH #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 07, 2023 10:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

