Love Jihad: आयपीएलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटर Mohsin Khan च्या भावावर 'लव्ह जिहाद’चा आरोप; खेळाडूनेही बलात्कार केल्याचा पिडीतेचा दावा (Watch Video)

पिडीत महिला हिंदू आहे.

Stop Rape (Representative image)

आजकाल देशात ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. आता क्रिकेट जगतातून अशी एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एका महिला कॉन्स्टेबलने तिचा पती इम्रान खानवर 'लव्ह जिहाद' आणि त्याचा भाऊ, लखनऊ सुपर जायंट्सचा आयपीएल क्रिकेटर मोहसिन खान याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू असलेल्या मोहसीन खानच्या भावावर धर्मांतराचा आरोप करण्यात आला आहे.  पिडीत महिलेने आरोप केला आहे की, तिचा पती इम्रानने तिला लग्नानंतर इस्लाम स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केली. तिने दावा केला की इम्रानने जेव्हा तिच्याशी लग्न केले तेव्हा त्याने धर्मांतर केले होते, परंतु आता तो तिला तिचा धर्म बदलण्यास भाग पाडत आहे. आरोपी इम्रान खान देखील यूपी पोलिसात हवालदार पदावर आहे. महिला कॉन्स्टेबलने तिचा सासरा मुलतान खान, दीर क्रिकेटर मोहसीन खान आणि पती इम्रान खान यांच्याविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक शोषण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दोघेही यूपी पोलिसातील हवालदार असल्याने प्रकरण दडपल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलीस विभागाने तपास सुरू केला आहे. (हेही वाचा: Bihar Shocker: बिहारमध्ये आंतरजातीय विवाह करणाऱ्या नववधुचे नातेवाईकांकडून अपहरण)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)