Corey Anderson Catch Video: हवेत उडताना अँडरसनने डाव्या हाताने पकडला आश्चर्यकारक झेल, डुप्लेसिस पाहतच राहिला, पाहा व्हायरल व्हिडिओ

टेक्सास आणि फ्रान्सिस्को यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Corey Anderson Catch Video: अमेरिकेत मेजर लीग क्रिकेट खेळले जात आहे. 27 जुलै रोजी सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स आणि टेक्सास सुपर किंग्ज यांच्यात प्लेऑफ सामना खेळला गेला. या सामन्यात टेक्सासचा पराभव करून सॅन फ्रान्सिस्कोने मेजर लीग क्रिकेटच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत त्याचा सामना वॉशिंग्टन फ्रीडमशी होईल. टेक्सास आणि फ्रान्सिस्को यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्नकडून खेळणाऱ्या कोरी अँडरसनने अप्रतिम क्षेत्ररक्षण करत हेवत उडी मारत डाव्या हाताने जबरदस्त झेल घेतला आहे.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)