Kuldeep Yadav Video: कुलदीपने टाकला आतापर्यंतचा सर्वात खतरनाक चेंडू, किवी फलंदाज झाला क्लिन बोल्ड, पाहतच राहिला (Watch Video)
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 99 धावा केल्या. दरम्यान, सामन्याचे 10वे षटक टाकणाऱ्या कुलदीप यादवने अवघ्या एका चेंडूवर खळबळ उडवून दिली.
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज लखनऊमध्ये खेळला जात आहे. पहिला सामना जिंकून न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 99 धावा केल्या. दरम्यान, सामन्याचे 10वे षटक टाकणाऱ्या कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) अवघ्या एका चेंडूवर खळबळ उडवून दिली. या षटकातील शेवटच्या चेंडूवर कुलदीपने न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डॅरिल मिशेलला बोल्ड केले. पण हा चेंडू सामान्य नव्हता. कुलदीपचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूप बाहेर पडला होता, पण या चेंडूने इतके मोठे वळण घेतले की खुद्द मिशेललाही आश्चर्य वाटले. मिशेल आश्चर्याने खेळपट्टीकडे पाहत होता. कुलदीपच्या या चेंडूचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोकही याला कुलदीपचा आतापर्यंतचा सर्वोत्तम चेंडू मानत आहेत.