IND vs AUS: नेट मध्ये सराव करताना कोहलीने दाखवला 'विराट' फॉर्म, वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळले पुल शॉट्स (Watch Video)

या मालिकेसाठी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी नेटमध्ये सराव सुरू केला आहे. भारतीय खेळाडूंनीही रविवारी नेटमध्ये पहिला सराव केला.

IND vs AUS: नेट मध्ये सराव करताना कोहलीने दाखवला 'विराट' फॉर्म, वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळले पुल शॉट्स (Watch Video)
Virat kohli (Photo Credit - Twitter)

भारतीय क्रिकेट संघाला (Team India) मंगळवारपासून ऑस्ट्रेलियासोबत तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहाली येथील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी नेटमध्ये सराव सुरू केला आहे. भारतीय खेळाडूंनीही रविवारी नेटमध्ये पहिला सराव केला. यावेळी फलंदाज विराट कोहलीही (Virat Kohli) पूर्ण रंगात दिसला. वेगवान गोलंदाजांवर पुल शॉट्स मारणे असो किंवा फिरकीपटूंसमोर आघाडी घेणे असो, विराट कोहलीने कठोर सराव करून रविवारी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी आपले इरादे स्पष्ट केले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 18, 2022 09:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).