Jay Shah Becomes New ICC Chairman: जय शाह बनले आयसीसीचे नवे अध्यक्ष; डिसेंबरमध्ये स्वीकारणार पदभार
जय शाह ऑक्टोबर 2019 पासून बीसीसीआयचे सचिव आणि जानेवारी 2021 पासून आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत.
Jay Shah Becomes New ICC Chairman: जय शाह हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) नवे अध्यक्ष बनले आहेत. शाह यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे आयसीसीने म्हटले आहे. शहा हे 1 डिसेंबर रोजी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. सध्या ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव आहेत. आयसीसी चेअरमन पदासाठी अर्ज करणारे एकमेव अर्जदार जय शाह होते. अशा स्थितीत निवडणूक झाली नाही आणि जय शहा यांची बिनविरोध निवड झाली. बीसीसीआयला आता सचिव पदावर नवीन नियुक्ती करावी लागणार आहे. अरुण जेटली यांचा मुलगा आणि दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) अध्यक्ष रोहन जेटली बीसीसीआयचे नवे सचिव होऊ शकतात. शहा यांनी पद सोडताच त्यांची नियुक्ती होऊ शकते.
आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबरला संपणार आहे. आयसीसीने 20 ऑगस्ट रोजी सांगितले होते की बार्कले सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष होणार नाही. आता जय शाह 1 डिसेंबर रोजी पदभार स्वीकारल्यानंतर आयसीसी अध्यक्ष बनणारे पाचवे भारतीय असतील. जय शाह ऑक्टोबर 2019 पासून बीसीसीआयचे सचिव आणि जानेवारी 2021 पासून आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. (हेही वाचा; Olly Stone Replaces Injured Mark Wood: ऑली स्टोन तीन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये परतणार, श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात दुखापतग्रस्त मार्क वुडची घेणार जागा)
जय शाह बनले आयसीसीचे नवे अध्यक्ष-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)