Jasprit Bumrah चे भारतीय संघात पुनरागमन, 6 महिन्यानंतर चमकणार 'या' मालिकेत

दुखापतीनंतर पुन्हा एकदा भारतीय संघात जसप्रीत बुमराह मैदानात परतण्यास होकार दिला आहे.

Jasprit Bumrah (Photo Credit - Twitter)

Jasprit Bumrah: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा मैदानात परतण्यास होकार दिला आहे. 29 वर्षीय उजव्या हाताच्या गोलंदाजाचा या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी यासंदर्भात एक निवेदन जारी करून याला दुजोरा दिला आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या माहितीनुसार जसप्रीत बुमराहला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (NCA) तंदुरुस्त घोषित केल्यानंतर निवड समितीने श्रीलंकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now