IND vs SA 2nd Test Day 2 Live Score Update: जसप्रीत बुमराहच्या घातक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिका 176 धावावर गारद, इतिहास रचण्यासाठी भारतासमोर 78 धावाचे लक्ष्य
दक्षिण आफ्रिकेचा संघ धावावर 176 ऑलआऊट झाला आहे. आणि यासोबत भारताला 78 धावाचे लक्ष्य मिळाले आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने सहा विकेट घेतल्या आहे. तर दक्षिण आफ्रिकेकडून एडन मार्कराम शानदार शतक झळकावले.
IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये (Cape Town) खेळवला जात आहे. आज (गुरुवार) सामन्याचा दुसरा दिवस आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ धावावर 176 ऑलआऊट झाला आहे. आणि यासोबत भारताला 78 धावाचे लक्ष्य मिळाले आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने सहा विकेट घेतल्या आहे. तर दक्षिण आफ्रिकेकडून एडन मार्कराम शानदार शतक झळकावले. याआधी सामन्याच्या पहिल्या दिवशी आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 55 धावांत गारद झाला होता. भारताकडून मोहम्मद सिराजने सहा विकेट घेतल्या. त्यानंतर भारत पहिल्याच दिवशी पहिल्या डावात 153 धावांवर ऑलआऊट झाला. दमदार सुरुवातीनंतर संघाची मोठी धावसंख्या हुकली. एकवेळ भारताच्या 153 धावांत 4 विकेट्स होत्या. मात्र लुंगी अँगिडीच्या चेंडूवर केएल राहुलने खराब शॉट खेळून आपली विकेट गमावली. त्यानंतर पुढच्या 11 चेंडूत कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडीने संपूर्ण संघ 153 धावांवर आटोपला. आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी 78 धावाची गरज आहे.
2ND Test. WICKET! 36.5: Lungi Ngidi 8(10) ct Yashasvi Jaiswal b Jasprit Bumrah, South Africa 176 all out https://t.co/PVJRWPfGBE #SAvIND
— BCCI (@BCCI) January 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 04, 2024 03:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

