Jason Roy ने PSL मध्ये घातला धुमाकूळ, अवघ्या 44 चेंडूत आपले शतक केले पूर्ण (Watch Video)

प्रथम फलंदाजी करताना पेशावर झल्मीने 20 षटकात 240 धावा केल्या. यामध्ये कर्णधार बाबर आझमने 115 धावा केल्या. यादरम्यान त्याने 15 चौकार आणि 3 षटकार मारले.

Jason Roy (Photo credit - Twitter)

बुधवारी, पाकिस्तान सुपर लीग 2023 च्या 25 व्या सामन्यात, षटकार आणि चौकारांचा पाऊस पडला. पेशावर झाल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात बाबर आझम आणि जेसन रॉय यांनी शतके झळकावली. प्रथम फलंदाजी करताना पेशावर झल्मीने 20 षटकात 240 धावा केल्या. यामध्ये कर्णधार बाबर आझमने 115 धावा केल्या. यादरम्यान त्याने 15 चौकार आणि 3 षटकार मारले. यानंतर दुसऱ्या डावात जेसन रॉयने (Jason Roy) जे केले ते पाहून दिग्गज क्रिकेटपटूंचाही आत्मा हादरला. 241 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयने आपल्या संघाला 145 धावा ठोकल्या. यादरम्यान त्याने एकूण 63 चेंडूंचा सामना केला.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now