Shikhar Dhawan Delhi-NCR Pollution: 'हे संकट आहे', दिल्ली-एनसीआर प्रदूषणाने शिखर धवनची चिंता वाढवली, लोकांना केले खास आवाहन
दिवाळीचा सण जवळ आल्याने लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज शिखर धवनची (Shikhar Dhawan) प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रकरणी धवनने लोकांना खास आवाहन केले आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषण सातत्याने वाढत आहे. अनेक ठिकाणी हवेचा दर्जा निर्देशांक 450 च्या पुढे गेला आहे. दिवाळीचा सण जवळ आल्याने लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज शिखर धवनची (Shikhar Dhawan) प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रकरणी धवनने लोकांना खास आवाहन केले आहे. शिखर धवनने ट्विट करून लिहिले- “दिल्ली-एनसीआरमध्ये धुके केवळ एका हंगामामुळे किंवा दिवाळीमुळे नाही. हे संकट आहे. चला स्वच्छ हवा आणि सुरक्षित वातावरणासाठी एकत्र येऊन काम करूया.” धवनचे हे ट्विट चर्चेचा विषय बनले आहे. यामध्ये अनेकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. (हे देखील वाचा: ICC Cricket World Cup 2023: भारताचे 'हे' मैदान फलंदाजांसाठी बनले स्वर्ग, विश्वचषकाच्या इतिहासात येथे झळकावली आहे सर्वाधिक शतके)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)