IPL Media Rights: स्टार इंडियाने 23,575 कोटींना विकत घेतले आयपीएलचे टीव्हीचे हक्क

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयोजित केलेल्या आयपीएल मीडिया हक्कांची बोली मंगळवारी (14 जून) मुंबईत संपली

IPL (Pic Credit- IPL twitter)

आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी येथे खेळून आपली कारकीर्द घडवली आहे. या लीगमध्ये खेळणे हे जवळ जवळ प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. आता इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या टीव्ही आणि डिजिटलच्या मीडिया हक्कांसाठी मोठी बोली लागली आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) ने इतिहास रचला आहे. पुढील पाच वर्षांसाठी मीडिया हक्क 48,390 कोटी रुपयांना विकले गेले आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयोजित केलेल्या आयपीएल मीडिया हक्कांची बोली मंगळवारी (14 जून) मुंबईत संपली. 12 जूनपासून सुरू झालेल्या या बोलीमध्ये स्टार इंडियाने आयपीएल टीव्ही आणि व्हायाकॉमने डिजिटल हक्क विकत घेतले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करून याला अधिकृत दुजोरा दिला आहे. बीसीसीआयने 2023 ते 2027 या कालावधीसाठी मीडिया हक्क विकले आहेत.

बीसीसीआयने चार पॅकेजमध्ये मीडिया हक्क विकले आहेत. बोर्डाने एकूण 48,390 कोटी रुपयांची कमाई केली आहे. स्टार इंडियाने 23,575 कोटी रुपयांचे टीव्ही हक्क विकत घेतले, दुसरीकडे व्हायाकॉम 18 ने 23,758 कोटी रुपयांचे डिजिटल हक्क विकत घेतले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)