IPL 2022, LSG vs CSK Match 7: रॉबिन उथप्पा - शिवम दुबे यांची ताबडतोड फलंदाजी, चेन्नईचे लखनऊला विजयासाठी 211 धावांचे डोंगराएवढे आव्हान

IPL 2022, LSG vs CSK Match 7: आयपीएलच्या सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पहिले फलंदाजी करून 20 षटकांत 7 बाद 210 धावा केल्या आणि लखनऊ सुपर जायंट्स संघापुढे 211 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले. सीएसकेसाठी रॉबिन उथप्पाने 50 धावा केल्या तर शिवम दुबे याने 49 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, लखनऊसाठी रवि बिश्नोई, अँड्र्यू टाय आणि आवेश खान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

IPL 2022, LSG vs CSK Match 7: रॉबिन उथप्पा - शिवम दुबे यांची ताबडतोड फलंदाजी, चेन्नईचे लखनऊला विजयासाठी 211 धावांचे डोंगराएवढे आव्हान
चेन्नई विरुद्ध लखनऊ (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, LSG vs CSK Match 7: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) पहिले फलंदाजी करून 20 षटकांत 7 बाद 210 धावा केल्या आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघापुढे विजयासाठी 211 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले. सीएसकेसाठी रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) 50 धावा केल्या तर शिवम दुबे (Shivam Dube) याने 49 धावांचे योगदान दिले. तसेच ऋतुराज गायकवाडला वगळता ​​चेन्नई सुपर किंग्स फलंदाजांनी वेगाने धावा काढल्या. मोईन अली याने 35 आणि ,अंबाती रायुडूने 27 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, लखनऊसाठी रवि बिश्नोई, अँड्र्यू टाय आणि आवेश खान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 31, 2022 09:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).