IPL 2022, CSK vs RCB Match 49: बेंगलोरने चेन्नईसमोर ठेवले 174 धावांचे टार्गेट, महिपाल लोमरोरने केल्या सर्वाधिक 42 धावा

IPL 2022, CSK vs RCB Match 49: आयपीएलच्या ‘आर या पार’च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 बाद 173 धावा केल्या आणि चेन्नई सुपर किंग्ससमोर विजयासाठी 174 धावांचे टार्गेट ठेवले आहे. आरसीबीसाठी महिपाल लोमरोरने सर्वाधिक 42 धावा केल्या. दुसरीकडे, चेन्नईच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. महेश तीक्षणाने डावातील 19 व्या षटकांत तीन विकेट घेतल्या.

IPL 2022, CSK vs RCB Match 49: बेंगलोरने चेन्नईसमोर ठेवले 174 धावांचे टार्गेट, महिपाल लोमरोरने केल्या सर्वाधिक 42 धावा
चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs RCB Match 49: आयपीएलच्या (IPL) ‘आर या पार’च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 बाद 173 धावा केल्या आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) समोर विजयासाठी 174 धावांचे टार्गेट ठेवले आहे. आरसीबीसाठी महिपाल लोमरोरने (Mahipal Lomror) सर्वाधिक 42 धावा केल्या. तर कर्णधार फाफ डु प्लेसिसने 38 आणि विराट कोहलीने 30 धावांचे छोटेखानी योगदान दिले. तसेच दिनेश कार्तिक 26 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, चेन्नईच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. महेश तीक्षणाने (Maheesh Theekshana) डावातील 19 व्या षटकांत तीन विकेट घेतल्या. याशिवाय मोईन अलीने 2 तर, ड्वेन प्रिटोरियसला एक यश मिळाले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 04, 2022 09:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).