India's ODI Team for SA Series: जसप्रीत बुमराहला लागली लॉटरी, मिळाली मोठी जबाबदारी

केएल राहुलला टीम इंडियाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. रोहित शर्मा दुखापतीमुळे एकदिवसीय मालिका खेळणार नाही

जसप्रीत बुमराह (Photo Credit: Twitter/T20WorldCup)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये केएल राहुलला टीम इंडियाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. रोहित शर्मा दुखापतीमुळे एकदिवसीय मालिका खेळणार नाही. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा नवा उपकर्णधार असेल. अशाप्रकारे जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. रविचंद्रन अश्विनचे ​​चार वर्षांनंतर वनडे संघात पुनरागमन झाले आहे. 18 सदस्यीय एकदिवसीय संघात सहा फलंदाज, दोन यष्टिरक्षक, दोन अष्टपैलू, दोन फिरकीपटू आणि सहा वेगवान गोलंदाज आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement