IND vs SA Test Series 2023: दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी आव्हानासाठी भारतीय फिरकी जोडी सज्ज, अश्विन-जडेजाने शेअर केला फोटो
दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी आव्हानासाठी गोलंदाजही सज्ज झाले आहेत. घातक आणि अनुभवी फिरकी जोडी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचाही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.
IND vs SA Test Series 2023: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका 26 डिसेंबरपासून (IND vs SA Test Series) सुरू होणार आहे. सेंच्युरियनमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाने इंट्रा स्क्वॉड मॅचमध्येही सहभाग घेतला होता. ज्यामध्ये भारतीय खेळाडूंनी तयारीला अंतिम रूप दिले. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी करत शतके झळकावली. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी आव्हानासाठी गोलंदाजही सज्ज झाले आहेत. घातक आणि अनुभवी फिरकी जोडी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचाही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी म्हणजेच 22 डिसेंबर रोजी झालेल्या इंट्रा स्क्वॉड सामन्यात दोन्ही खेळाडू सराव जर्सीमध्ये एकत्र दिसले. रवी अश्विनने जडेजासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. कसोटीपूर्वी भारतीय फिरकी जोडीने सराव केला, ज्याची माहिती खुद्द अश्विनने शेअर केली आहे. अश्विनने इंस्टाग्रामवर ट्विट केलेल्या फोटोला 'टेस्ट मॅच प्रेप' असे कॅप्शन दिले आहे. (हे देखील वाचा: IND vs SA Test Series 2023: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात विराट कोहली करु शकतो नवीन विक्रम, सेहवाग - द्रविडला टाकणार मागे)
Test match prep ✅✅ @imjadeja pic.twitter.com/nrLKlM0f1g
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) December 22, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 22, 2023 09:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

