India vs Sri Lanka: श्रीलंकेवर 3-0 ने विजय मिळवल्यानंतर रिंकू सिंगला मिळाला 'फिल्डर ऑफ द सीरीज'चा पुरस्कार, BCCI ने शेअर केला व्हिडिओ

भारताचे फील्डिंग कोच टी दिलीप यांनी 'फिल्डर ऑफ द सीरीज' पुरस्कारासाठी दावेदारांची घोषणा केली आणि रवी बिश्नोई, रिंकू सिंग आणि रायन पराग यांची नावे घेतली.

भारताचा स्टार फलंदाज रिंकू सिंगला टी-20 मालिकेत श्रीलंकेवर 3-0 अशा विजयानंतर 'फिल्डर ऑफ द सीरीज' पुरस्कार मिळाला. नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या पहिल्या दौऱ्याची सुरुवात श्रीलंकेवर 3-० ने मालिका विजयाने झाली. मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने यजमान संघाचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. दरम्यान, बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे. फील्डिंग कोच टी. दिलीप भाषण करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान भारताचे  फील्डिंग कोच टी दिलीप यांनी 'फिल्डर ऑफ द सीरीज' पुरस्कारासाठी दावेदारांची घोषणा केली आणि रवी बिश्नोई, रिंकू सिंग आणि रायन पराग यांची नावे घेतली. मात्र, सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेटे यांनी रिंकू सिंगला 'फिल्डर ऑफ द सिरीज' पदक दिले. तुम्ही खालील व्हिडिओ पाहू शकता.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement