India Tour of South Africa 2021: भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सस्पेन्स ओव्हर; कसोटी आणि वनडे सामन्यांची रंगणार मालिका; BCCI सचिवांनी केली पुष्टी

कोरोना व्हायरसच्या नवीन ओमिक्रोन व्हेरियंटचा धोका कायम असतानाही विराट कोहलीची टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार असल्याची पुष्टी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी केली आहे. 17 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारत तीन टेस्ट, तीन वनडे आणि चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार होता. मात्र यापूर्वी ठरलेल्या कार्यक्रमात बदल झाला आहे.

BCCI Secretary Jay Shah and President Sourav Ganguly. (Photo Credits: ANI)

India Tour of South Africa 2021: कोरोना व्हायरच्या नवीन ओमिक्रॉन व्हेरियंटचा (Omicron Variant) धोका असूनही भारतीय क्रिकेट संघ (Indian Team) या महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेचा दौरा (South Africa Tour) करणार आहे. तथापि, मूळ वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार भारतीय संघ आता दौऱ्यावर फक्त तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-20 मालिकेबाबत नंतर निर्णय घेतला जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now