India Tour of Ireland 2022: भारताविरुद्ध आयर्लंड ‘सिझन ऑफ स्टार्स’ची करणार सुरुवात, येथे पहा T20 मालिकेचे शेड्यूल

आयर्लंडने जूनमध्ये भारतीय संघाच्या आयर्लंड दौऱ्याची पुष्टी केली. इंग्लंड दौऱ्यापूर्वी जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावरील टी-20 संघ 26 आणि 28 जून रोजी दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळेल. तथापि या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, आणि जसप्रीत बुमराह यांसारखे आघाडीचे खेळाडू नसतील कारण ते गेल्या वर्षीच्या इंग्लंड दौऱ्यातील उर्वरित एक कसोटी सामना 1 ते 5 जुलै रोजी खेळणार आहे.

रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

India Tour of Ireland 2022: क्रिकेट आयर्लंडने (Cricket Ireland) मंगळवारी भारताच्या जूनमधील आयर्लंड दौऱ्याची (India Tour of Ireland) पुष्टी केली. जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेला T20I संघ इंग्लंड दौरा सुरु होण्यापूर्वी 26 आणि 28 जून रोजी 2 टी-20 सामने खेळण्यासाठी आयर्लंड दौऱ्यावर जाईल. इतकंच नाही तर आयर्लंड 2 महिन्यांच्या कालावधीत भारता ऐवजी न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानविरुद्ध व्हाईट-बॉल मालिका खेळेल, असे क्रिकेट आयर्लंडने सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now