IND vs HK, Asia Cup 2022: भारताने हाँगकाँगसमोर ठेवले 193 धावांचे लक्ष्य, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवने ठोकले अर्धशतक

या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 98 धावांची भागीदारी झाली.

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील हाँगकाँगविरुद्धच्या टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांत 2 गडी गमावून 192 धावा केल्या. भारताकडून सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांनी अर्धशतके झळकावली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पॉवरप्लेमध्ये 1 गडी गमावून 44 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा 13 चेंडूत 21 धावा करून झेलबाद झाला. केएल राहुलने अतिशय संथ खेळी खेळली आणि तो 39 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीने एकही विकेट पडू दिली नाही आणि भारताला मजबूत स्थितीत आणले. या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 98 धावांची भागीदारी झाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)