India vs Bangladesh 1st Test Day 2 Live Score Update: भारताचा पहिला डाव 376 धावांवर आटोपला, आर अश्विनने लढवला किल्ला; हसन महमूदने घेतले पाच बळी

आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे. तर बांगलादेश संघाचे नेतृत्व नजमुल हुसेन शांतोकडे आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 6 गडी गमावून 339 धावा केल्या होत्या.

India vs Bangladesh 1st Test Day 2 Live Score Update: भारताचा पहिला डाव 376 धावांवर आटोपला, आर अश्विनने लढवला किल्ला; हसन महमूदने घेतले पाच बळी
PIC Credit - BCCI X Account

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत (Indian National Cricket Team) आणि बांगलादेश (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. हा कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे. तर बांगलादेश संघाचे नेतृत्व नजमुल हुसेन शांतोकडे आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 6 गडी गमावून 339 धावा केल्या होत्या. पहिल्या दिवशी भारताकडून रविचंद्रन अश्विनने झटपट शतक झळकावले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 376 धावांवर आटोपला आहे. भारताकडून रविचंद्रन अश्विन 113, रवींद्र जडेजा 86 आणि यशस्वी जैस्वाल 56 यांनी सर्वाधिक धावा केल्या. तर बांगलादेशकडून हसन महमूदने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).