Rahul Dravid Celebration Video: भारताने 17 वर्षांनंतर उचलली टी-20 विश्वचषक ट्रॉफी, राहुल द्रविडने या शैलीत केला आनंद साजरा; पाहा व्हिडिओ
प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा हा शेवटचा सामना होता. टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात राहुल द्रविडनेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राहुल द्रविडनेही खास पद्धतीने विजय साजरा केला.
IND vs SA T20 World Cup Final: टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात बार्बाडोस येथे खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा आयससी टी-20 विश्वचषकावर कब्जा केला आहे. टीम इंडियाने या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आणि संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 169 धावाच करू शकला. टीम इंडियाने ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. दरम्यान, प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा हा शेवटचा सामना होता. टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात राहुल द्रविडनेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राहुल द्रविडनेही खास पद्धतीने विजय साजरा केला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ
RAHUL DRAVID WITH THE WORLD CUP TROPHYpic.twitter.com/3Q1hv4HuES
— KKR Vibe (@KnightsVibe) June 29, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 30, 2024 12:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

