IND vs AFG 3rd T20 Live Score Update: भारताला मिळाली दुसरी विकेट, संजू सॅमसने इब्राहिम झद्रानला चपळाईने केले बाद
भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 212 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने टी-20 मधले पाचवे शतक ठोकले तर रिंकूने 69 धावांची वादळी खेळी खेळली.
IND vs AFG 3rd T20I: भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील टी-20 मालिकेतील (T20I Series) तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. मालिकेच्या दृष्टीने या सामन्याला महत्त्व नाही. भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिका जिंकली. मात्र, हा सामना जिंकून अफगाणिस्तानचा सफाया करण्याचा टीम इंडियाचा (Team India) प्रयत्न असेल. त्याचबरोबर अफगाण संघाला विजयासह मालिका संपवायची आहे. अफगाणिस्तान अजूनही कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारताविरुद्धच्या पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 212 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने टी-20 मधले पाचवे शतक ठोकले तर रिंकूने 69 धावांची वादळी खेळी खेळली. अफगाणिस्ताला हा सामना जिंकण्यासाठी 213 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या अफगाणिस्तानला पहिला धक्का बसला आहे. अफगाणिस्तानचा स्कोर 107/2
3RD T20I. WICKET! 12.3: Ibrahim Zadran 50(41) st Sanju Samson b Washington Sundar, Afghanistan 107/2 https://t.co/oJkETwOHlL #INDvAFG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) January 17, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 17, 2024 09:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

